'ती' 16 दिवसांनी झोपेतून जागी झाली, पण विसरली आयुष्यातील 20 वर्ष

UK मधल्या 43 वर्षांच्या क्लेअर मफेट रीके या महिलेचं आयुष्य सुखात होतं.

मात्र तिला Encephalitis हा मेंदूचा गंभीर विकार होता.

जून 2021मध्ये एके रात्री ती झोपली, ती दुसऱ्या दिवशी उठलीच नाही.

हॉस्पिटलमध्ये नेल्यावर उपचार सुरू असताना 16 दिवसांनी ती शुद्धीवर आली.

ती शुद्धीवर आल्यावर कळलं, की गेल्या 20 वर्षांचा भूतकाळ ती विसरली आहे.

हे कळल्यावर क्लेअरचे पती स्कॉट यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

ती मुलं, नातेवाईकांना ओळखत होती; मात्र त्यांचं नातं तिला आठवत नव्हतं. 

ती पतीलाही ओळखत होती; मात्र तिला स्वतःचं लग्न आठवत नव्हतं.

मुलांचे वाढदिवस, त्यांचा शाळेतला पहिला दिवस अशा घटना ती विसरली होती.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?