Live Death, लग्नात नाचता नाचता तरुणाचा मृत्यू

आजकाल हृदयाच्या झटक्याचे प्रमाण वाढलं आहे. यामुळे अनेकांचा जीव जातोय.

 मध्य प्रदेशच्या रीवामध्ये एका तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

लग्न समारंभासाठी वरातीतील नाचताना तरुणाचा जीव गेला. 

मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अभय सचन असून तो 32 वर्षांचा होता. 

नाचत असताना अचानक अभयला हृदयविकाराचा झटका आला.

घाईगडबडीत अभयला संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

या घटनेनंतर आनंदाचं वातावरण दुःखामध्ये बदललं. 

दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.