जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल, टॉयलेट सीटही सोन्यानं बनवली
जगात अशी अनेक हॉटेल्स आहेत जी आधुनिक सुविधांसह बनवली आहेत.
विचित्र आणि अनोख्या डिझाईनसाठीही अनेक हॉटेल्स प्रसिद्ध आहेत.
यातीलच एक अनोखं हॉटेल व्हिएनतामची राजधानी हनोईमध्ये आहे.
या हॉटेलला जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल म्हटलं जातं.
हॉटेलचे दरवाजे, खिडक्या, फर्निचर, नळ, वॉशरूमसह सर्व काही बनवण्यासाठी सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर या हॉटेलमधील जेवणाची भांडीही सोन्याची आहेत.
हॉटेलच्या लॉबीतील फर्निचर, सामानावर सोन्याचे काम केले आहे.
हॉटेलच्या लॉबीतील फर्निचर, सामानावर सोन्याचे काम केले आहे.
वॉशरुमपासून सर्व सामानांवरदेखील सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे.