आज आम्ही अशाच काही ठिकाणींबद्दल सांगणार आहेत, जेथे महिलाच्या जाण्यावर बंदी आहे
1. सौदी अरेबिया
येथे महिलांना एकट्याने प्रवास करण्याची परवानगी नाही.
जर महिलांना सौदीला जायचे असेल किंवा येथे कुठेही फिरायचं असेल तर पुरुषालासोबत घ्यावे लागेल.
2. अयप्पा मंदिर, केरळ
हे मंदिर सबरीमाला मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
भगवान अयप्पा ब्रह्मचारी होते, त्यामुळे या मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश नाही.
3. हाजी अली दर्गा, मुंबई
हा दर्गा 15 व्या शतकात संत पीर हाजी अली बुखारी यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आला होता..
असे मानले जाते की शरियत कायद्यात स्त्रीने दर्गाला भेट देणे गैर-इस्लामी आहे. येथे महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलनेही केली गेली आहेत
4. माउंट ओमिन, जपान
याला युनेस्कोने जागतिक वारसा घोषित केले आहे.
गेल्या 1300 वर्षांपासून येथे महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. स्त्रिया धर्माच्या मार्गात अडथळे निर्माण करतात, अशी धार्मिक धारणा आहे.
5. माउंट एथोस, ग्रीस
माउंट एथोस हे ग्रीसमधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.
धर्माच्या मार्गात महिला अडथळे आणतात असे येथे राहणारे साधू सांगतात.
असे मानले जाते की 1920 मध्ये एक महिला फ्रेंच लेखक संन्यासी म्हणून येथे आली होती, त्यासाठी तिने आपले दोन्ही स्तन कापले होते.
नोट : अंदोलनानंतर काही भागात आता महिलांना जाण्याची परवानगी दिली गेली आहे.