पती नोकरीच्या शोधात परदेशात गेला होता. या काळात पत्नी वारंवार तिच्या माहेरच्या घरी जाऊ लागली. 

दरम्यान, तिचे माहेरकडीलच दोन लोकांशी अनैतिक संबंध सुरू झाले. महिला त्यांना भेटण्यासाठी सतत तिच्या माहेरच्या घरी जाऊ लागली.

नंतर महिलेनेही त्यांना घरी बोलावण्यास सुरुवात केली. 

एकदा तिने दोन्ही प्रियकरांना सासरच्या घरी बोलावलं. इतक्यात महिलेच्या सासूला खोलीतून काहीतरी आवाज आला 

सासू पाहण्यासाठी गेली असता, तिला सून 2 पुरुषांसोबत खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली 

यानंतर सासूने तिघांनाही आत बंद करून खोलीला कुलूप लावलं आणि 112 डायल करून पोलिसांना फोन केला

पोलीस गावात पोहोचल्यावर महिलेने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. 

पोलिसांसमोरच खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. सासूने सून आणि दोन्ही तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.

महिलेनं तिच्या सुनेविरुद्ध तक्रार केली आहे. याप्रकरणी शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

हे हैराण करणारं प्रकरण यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस स्टेशन परिसरातील गावाशी संबंधित आहे.

Your Page!