एक पेग पिण्यासाठी  महिलेने दिले 9 लाख रुपये

जगात एकापेक्षा एक महागडी दारु विकली जाते. 

महागडी दारु पिणारे काही निवडकच लोक आहेत. जे एवढा पैसा दारुवर खर्च करतील. 

एका भारतीय महिलेने फक्त एक पेगसाठी 9 लाख रुपये खर्च केले.

एका पेगसाठी एवढा खर्च करणाऱ्या महिलेचे नाव रंजिता दत्त आहे. 

रंजिता या ट्रिनिटी नॅचरल गॅसच्या संस्थापक आणि संचालक आहेत. 

एका रिपोर्टनुसार, 2019 मध्ये रंजिता यांनी जगातील सर्वात महागडा पेग प्यायला होता. 

या पेगनंतर त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवलं गेलं. 

या एका पेगसाठी रंजिताने लंडनच्या बारमध्ये 10,014 युरो म्हणजेच जवळपास 9 लाख खर्च केले होते.

40 ml चा हा एक पेग रोम डी बेलेगार्डे ड्रिंकचा आहे.