आता एक असं प्रेम प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आलं आहे, जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल
कानपूरमध्ये एक तरुणी चक्क प्रियकराच्या वडिलांसोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी मुलाचे वडील आणि प्रेयसीला ताब्यात घेतलं आहे.
कमलेश हा गवंडी असून त्याचा मुलगा मजुरीचे काम करायचा. दरम्यान, मुलाचे परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध सुरू झाले.
मुलगी अनेकदा त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात असे. पण मुलगा कामावर जायचा.
त्यामुळे हळूहळू ती मुलाच्या वडिलांशी बोलू लागली आणि दोघेही प्रेमात पडले.
त्यानंतर कमलेश आपल्याच मुलाच्या प्रेयसीसोबत फरार झाले.
पोलिसांनी तरुणाचे वडील आणि प्रेयसीला दिल्लीतून ताब्यात घेतलं आहे.
पोलीस मुलीचं मेडिकल करत आहेत. तर तरुणीने म्हटलं, की तिला कमलेशसोबत राहायचं आहे.
कमलेश आणि तरुणी दोघेही प्रौढ आहेत. पोलीस दोघांचे जबाब नोंदवत असून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.