काही समजुती आणि परंपरा आपल्या देशात अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत
आजही त्या पाळल्या जात आहेत.
एखाद्याच्या अंत्यसंस्कारातून आल्यानंतर आंघोळ करावी, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
हे म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु त्यामागील कारण माहिती आहे का?
यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे
ते असं की, एखाद्याचा मृत्यू झाला की शरीर कुजण्यास सुरुवात होते
मृतदेह हा बराचकाळ बाहेर असतो, त्यामुळे वातावरणात सुक्ष्म आणि संक्रामक किटाणूंचा संसर्ग वाढतो
त्यामुळे हवेत काही प्रमाणात जंतू, बॅक्टेरिया पसरण्यास सुरुवात होते
जेव्हा आपण एखाद्याच्या अंत्यसंस्काराला जातो तेव्हा आपले शरीर त्यांच्या संपर्कात येतं.
याच कारणांमुळे अंत्यसंस्कारावरुन येताच अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो