फ्रीजची साईज लीटरमध्ये का असते? 

दुकानामध्ये फ्रीज खरेदीसाठी गेलात तर त्याची क्षमता लीटरमध्ये असते. 

फ्रीजची क्षमता ही सामान स्टोर करण्यासाठी असते. 

फ्रीजचे शेल्फ आणि बाकी सामान हटवल्यानंतरच्या जागेचं हे माप आहे. 

क्युबचा आकार समजा 10 cm X 10 cm X 10 cm आहे म्हणजेच 1 लीटर आहे. 

200 लीटरच्या फ्रीजमध्ये असे 200 क्युब येऊ शकतात. 

किंवा असंही म्हणू शकतो 2-2 लीटरच्या 100 बाटल्या असू शकतात. 

तुम्ही मेजरिंग टेपनेही फ्रीज मोजू शकता. 

फ्रीज रिकामा करुन त्याची उंची, रुंदी, खोली सेंटीमीटरमध्ये मोजा. 

या तिन्हीचा गुणाकार करुन 1000 ने भागा. तुम्हाला फ्रीजची ऐकून क्षमता किती आहे ते मिळेल.