भारतातील पंख्यांना तीन पाती का असतात? 

प्रत्येकाच्या घरात फॅन म्हणजेच पंखा हा सर्रास आढळतो. 

तुम्ही कधी विचार केलाय का भारतीय पंख्याना फक्त तीनच पाती का असतात? 

विज्ञानानुसार, पंख्यामध्ये जितके ब्लेड कमी असतील तितकी हवा जास्त फेकली जाते. 

भारतात अशाच पंख्यांना जास्त वाव आहे ज्याची जास्त प्रमाणात हवा लागते. 

त्यामुळे भारतात तीन पाती असलेले पंखे जास्त वापरले जातात. 

तीन पेक्षा जास्त पाती असलेल्या पंखांच्या मोटारवर दाब येतो. 

जगात फक्त 3 आणि 4 पातीच असलेले पंखे नसून यामध्ये 5, 6 पाती असलेले पंखेदेखील आहे.

भारतात 4 पातीचे पंखेदेखील आहेत मात्र जास्त कल 3 पात्यांच्या पंख्याकडे आहे. 

उष्ण तापमान असलेला देश असल्यामुळे भारतात अशा पंख्यांचा जास्त वापर केला जातो.