लग्नानंतर बांगड्या घालण्यामागे धार्मिकसोबतच वैज्ञानिक कारणही आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
रिपोर्टनुसार, बांगड्या मनगटात घातल्या जातात त्यामुळे सतत घर्षण होत असतं. या घर्षणामुळे रक्ताभिसरण सुरळीत चालतं.
यासोबतच मनगटात अनेक प्रेशर पॉइंट्स आहेत जे एक्यूप्रेशरमध्ये उपयुक्त आहेत असे मानले जाते.
बांगड्या घातल्याने ते प्रेशर पॉइंट्सही दाबले जातात, ज्यामुळे हार्मोनल बॅलन्स राखला जातो.
बांगड्या घालण्यामागे आणखी एक शास्त्रीय कारण आहे. यामुळे आई आणि गर्भात वाढणारे मूल चिंतामुक्त होते.
असं मानलं जातं की बांगड्यांचा आवाज आईबरोबरच पोटातील बालकालाही ऐकू येतो. सातव्या महिन्यात मुलांच्या मेंदूच्या पेशी सक्रिय होऊन आवाज ओळखू लागतात.
रंगीबेरंगी बांगड्या मनाला शांती आणि डोळ्यांनाही आराम देतात.
सोन्या-चांदीच्या बांगड्या घातल्याने आरोग्य सुधारते असा दावाही काही लोक करतात.
सोने आणि चांदी हे असे पदार्थ आहेत जे त्वचेला स्पर्श केल्यावर त्यांचा प्रभाव दर्शवतात आणि ते शरीराला ऊर्जा प्रदान करतात.
असं मानलं जातं की त्यांचा धातूचा गुणधर्म बांगड्यांद्वारे शरीरात प्रवेश करतो.