या ठिकाणी करतात ज्वालामुखीची पूजा
हिंदू धर्मात अनेक सण आहेत ज्यांचे वेगवेगळे महत्त्व आहे.
असाच एक अनोखा सण इंडोनेशियामध्ये साजरा केला जातो.
या अनोख्या सणाचं नाव यज्ञ कसदा आहे.
हा सण साजरा करण्यासाठी येथील लोक ब्रोमो पर्वतावर जातात.
या सणाच्या निमित्ताने गणेश भगवान आणि ब्रम्हाजींची पूजा केली जाते.
ज्वालामुखीमध्ये ब्रम्हदेवाचं वास्तव्य असल्याचं मानलं जातं.
गणेशजी ज्वालामुखीच्या कहरासून लोकांना वाचवतात, अशी मान्यता आहे.
त्यामुळे या ठिकाणचे लोक ज्वालामुखीची पूजा करतात.
ही पूजा करण्याची परंपरा 500 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं.