जीव वाचवण्यासाठी वाघासमोर बिबट्याची माघार 

 प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

शिकारीच्या थराराच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते.

जंगलातील शिकारीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातील वाघ एका ठिकाणी शांत बसलेला पहायला मिळत आहे. 

अचानक त्याला समोर बिबट्या दिसतो आणि तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडे धावत जातो.

वाघाला पाहून बिबट्या खाली कोसळतो आणि जीव वाचवण्यासाठी तो शरणागती पत्करतो.

वाघ बिबट्याच्या बाजूने फेऱ्या मारताना दिसत आहे. 

वाघ आणि बिबट्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जंगलातील दोन्ही धोकादायक प्राणी पहायला मिळत आहेत.