वाघ वाघिणीच्या शिकारीचा थरार
जंगलातील अनेक विचित्र, भयानक हल्ल्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होतात.
अशातच प्राण्यांच्या हल्ल्याचा आणखी एक घटना समोर आलीये.
वाघ आणि वाघिणीच्या हा भांडणाचा थरार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
वाघिणीने हरणाची शिकार केली असून ती आरामात बसून तिचं अन्न खात आहे.
ती हरणाला खात असताना तेवढ्यात तिथे वाघ येतो आणि वाघिणीचं अन्न खायला लागतो.
हे पाहून वाघिण संतापते आणि वाघावर हल्ला चढवते.
वाघ आणि वाघिणीमध्ये जोरदार भांडण होते.
शेवटी वाघ वाघिणीला हरवण्यात यशस्वी होतो. तो शिकार केलेल्या हरणाला ओढत झाड्यांमध्ये घेऊन जातो.
वाघिण मात्र भगतच राहते. शिकार करुनही तिच्या हाताला ते लागत नाही.