दान केले 50 लाख रुपये

श्रीमंतांनाही लाजवेल 
भिकाऱ्याची 'श्रीमंती'

भीक मागून स्वतःचा पोट भरणारा भिकारी दानामुळे चर्चेत.

72 वर्षांचा पुलपांडियन
गेली कित्येक वर्षे भीक मागत आहे.

भीक मागून मागून मिळालेले
50 लाख रुपये त्याने दानही केले.

मे 2020 साली त्याने 10 हजार रुपयांचं पहिलं दान केले. 

कोरोना कालावधीत त्याने
90 हजार रुपये दान केले.

त्याने सीएम रिलीफ फंडात गरजूंसाठी पैसे दिले आहेत.

भीक मागितली त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातही त्याने पैसे दिले. 

एकटा असल्याने भीक मागून गरजेपेक्षा जास्त मिळालेले पैसे  दान करतो, असं तो म्हणाला.

पैसाच नव्हे तर मनानेही श्रीमंत असा हा भिकारी तामिळनाडूत आहे.