स्टाईलने चहा भरणं विक्रेत्याला भोवलं
थंडीच्या दिवसांमध्ये चहाची ओढ जरा जास्तच असते.
हिवाळ्यात लोक जास्त चहा पितात. त्यामुळे चहाच्या दुकानाबाहेर तुफान गर्दी पहायला मिळते.
आजकाल चहावालेही अनोख्या स्टाईलमध्ये चहा विकताना दिसतात.
कधी कधी ही चहा विक्रेत्यांची स्टाईल अंगलट येतानाही दिसून येते.
हटक्या स्टाईलमध्ये चहा विकणं एका चहा विक्रेत्याला चांगलंच महागात पडलंय.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गरम चहा प्लॅस्टिकच्या पिशवीत फिरवत भरणं चहा विक्रेत्याच्य भाोवलं.
प्लॅस्टिक फुटून चहा थेट त्या व्यक्तीच्या तोंडावर येऊन पडतो.
चहा गरम असल्यामुळे चहा विक्रेता चांगलाच होरपळला आहे.