भारतात अशा अनेक प्रथा परंपरा आहेत, ज्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत
यातीलच एक म्हणजे नदीत नाणी टाकणं
नदीत नाणी टाकण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे
ज्या काळात ही प्रथा सुरू झाली तेव्हा तांब्याची नाणी वापरली जायची
पाणी शुद्धीकरणासाठी तांब्याचा वापर केला जातो.
म्हणूनच जेव्हा लोक नदी किंवा तलावाजवळून जायचे तेव्हा त्यात तांब्याचे नाणे टाकायचे
यामागे धार्मिक कारणही आहे
ज्योतिषशास्त्रानुसार, लोकांना कोणत्याही प्रकारचे दोष दूर करायचे असतील तर नाणी आणि काही पूजा साहित्य पाण्यात टाकावं.
चांदीचे नाणे वाहत्या पाण्यात टाकल्यास दोष संपतात.
अनेकांचा असाही विश्वास आहे ,की नाणे टाकल्याने नशिबाची साथ मिळते.