उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी पितात. या काळात लोक बाटलीबंद पाणी देखील पितात, जे खूप चांगलं मानलं जातं.

पण तुम्हाला माहित आहे का पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिली जाते?

असं मानलं जातं की पाणी कधीही खराब होत नाही आणि जर पाणी स्वच्छ असेल तर ते बरेच दिवस टिकतं. पण तरीही बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिली जाते? 

तज्ज्ञांच्या मते, पाण्याची एक्स्पायरी डेट नसते. पण ज्या प्लास्टिकच्या बाटल्या पाणी साठवण्यासाठी वापरल्या जातात त्यांची एक्सपायरी डेट नक्कीच असते. 

त्यामुळेच या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिली जाते. बाटलीतील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या सर्वोच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि ते वापरासाठी असुरक्षित असू शकतं. 

सुरक्षितता आणि आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे.  ही तारीख निर्मात्याद्वारे निश्चित केली जाते.

दुसर्‍या अहवालानुसार, एक्सपायरी डेटनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि ते वापरणं सुरक्षित असू शकत नाही. 

एक्सपायरी डेट निघून गेल्यास वापरकर्त्याने बाटलीतील पाणी पिऊ नये. 

हे देखील खरं आहे की ठराविक काळानंतर प्लास्टिक पाण्यात विरघळू लागतं आणि त्यामुळेच बाटलीवर एक्स्पायरी डेट लिहिली जाते.