जेव्हा
23 वर्षीय लेकीला समजलं
तिची आई आहे प्रेग्नंट तेव्हा...
'बधाई हो' फिल्मसारखी रिअल लाइफ स्टोरी चर्चेत आली आहे.
23 वर्षांच्या तरुणीची 47 वर्षांची आई प्रेग्नंट झाली.
लेक बंगळुरूत आणि आईवडील केरळमध्ये राहत होते.
बाबांनी लेकीला कसंबसं फोनवर आईच्या प्रेग्नन्सीबाबत सांगितलं.
एकुलत्या एक तरुण लेकीला पालकांनी मोठा धक्का दिला.
तरुणीला लाज वाटली, घरी जाऊन ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडली.
पण नंतर हे सर्व कसं घडलं हे तिच्या आईने तिला सांगितलं.
एका मंदिरात ती चक्कर येऊन पडली, डॉक्टरांनी गूड न्यूज असल्याचं सांगितलं.
तरुणीच्या आईलाही ती प्रेग्नंट असल्याचं प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात समजलं.
तरुणीला तसं एक भावंडं हवं होतं, पण तिच्या आईला समस्या होती.
त्यामुळे प्रेग्नन्सीबाबत तिच्या
आईनेही कधीच विचार केला नाही.
म्हणजे हा एक चमत्कारच आहे,
असं मानून तरुणीने ते स्वीकारलं.
आईने एका मुलीला जन्म दिला, लेकीचा आनंद
गगनात मावेनासा झाला
इतक्या वर्षांनी भावंडं झाल्यानंतर
आता ती छोट्या बहिणीकडून दीदी ऐकण्यासाठी उत्सुक आहे.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'वर
या मायलेकीची स्टोरी
शेअर करण्यात आली आहे.