एका 31 वर्षांच्या महिलेनं एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला 90 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 

कारण आहे तिच्या बाळाच्या वडिलांचं वय. महिलेनं तुरुंगात जाण्यास नकार दिला होता, तरीही आता ती तुरुंगात आहे. 

हे प्रकरण अमेरिकेतील कोलोरॅडो येथील आहे. महिलेनं ज्या बाळाला जन्म दिला आहे त्याचे वडील केवळ 13 वर्षांचे आहेत. 

हा मुलगा त्या महिलेला 'आई' म्हणून हाक मारायचा. महिलेने या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर ती गरोदर राहिली. 

तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्यानंतर तिला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आंद्रिया सेरानो असं आरोपी महिलेचं नाव आहे. तिला गुरुवारी शिक्षा सुनावण्यात आली. 

गेल्या वर्षी तिला अटक केल्यानंतर, सेरानोने 13 वर्षांच्या मुलाच्या बाळाला जन्म दिला. मूल अजूनही तिच्याच देखरेखीखाली आहे.

पीडित मुलगा आता 14 वर्षांचा आहे. त्याचा ताबा मिळावा यासाठी त्याचे कुटुंबीय न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. 

सेरानो आणि मुलगा यांच्यातील संबंधांची पुष्टी झालेली नाही. पण सेरानो त्याची सरोगेट मदर असल्याचं बोललं जात आहे. 

म्हणूनच तो तिला आई म्हणतो. मात्र तो तिच्यासोबत का आणि कधीपासून राहतो, ही माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.