असं ठिकाण जेथील लोक फिरतात विनाकपड्यात

आधुनिक माणूस संपूर्ण कपड्यात फिरताना दिसतो, अलीकडच्या काळात तर फॅशनेबल कपडे घालतात.

त्यामुळे आता माणसाला कपड्यांशिवाय राहायला सांगितलं तर विचित्र वाटतं. शिवाय समाज देखील ते मान्य करत नाही.

असं असलं तरी जगात असे काही लोक आहेत ज्यांना कपडे न घालता फिरणे अधिक मोकळे वाटते.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक कपड्यांशिवाय फिरतात.

कॅप डी'एग्डे, हे फ्रान्सचे नग्न शहर म्हणून ओळखले जाते, ते असे ठिकाण आहे जिथे लोक त्यांना हवे तसे कपडे घालतात.

इथे लोक कपड्यांशिवाय रस्त्यावर फिरताना आढळतील. ते मॉल्स, रेस्टॉरंट्स,  सर्वत्र लोक कपड्यांशिवाय फिरतात.

फ्लोरिडा प्रांतात एक खास समुद्रकिनारा आहे, जिथे लोक कपड्यांशिवाय दिसतात. याला नेकेड बीच असे म्हणतात.

जपानमध्ये एक इवेंट असतो, त्यावेळी लोकांनी कसे ही कपडे घालण्याचे किंवा न घालण्याचे स्वातंत्र्य आहे.

ऑस्ट्रियामध्ये दरवर्षी नेकेड आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. येथे माणसांच्या अंगावर पेटिंग केली जाते.

ब्रिटनमधील हर्टफोर्डशायरमधील स्पीलप्लॅट्झ नावाचे गाव कपड्यांशिवाय राहणाऱ्या लोकांसाठी प्रसिद्ध आहे. 

दरवर्षी  काही शहरांमध्ये नेकेड बाईक राइड रेस आयोजित केली जाते. निरोगी शरीराला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो.