तुम्ही अशा अनेक ठिकाणांबद्दल वाचलं आणि ऐकलं असेल, जी पूर्वी माणसांनी भरलेली होती. मात्र कालांतराने अशी घटना घडली की शहरं रिकामी झाली
लोकांनी मोठी शहरे सोडली, त्यानंतर तेथील इमारती आणि सर्व पायाभूत सुविधा निरुपयोगी झाल्या. सध्या ब्रिटनमधील अशाच एका शहराची चर्चा होत आहे.
या शहराला ब्रिटनचे चेरनोबिल म्हणतात. हे शहर मोठमोठे अपार्टमेंट्स, शॉपिंग मॉल्स आणि चित्रपटगृहांनी भरलेलं आहे.
पण या ठिकाणी फक्त एकाच गोष्टीचा अभाव आहे. ते म्हणजे लोक. या ठिकाणी कोणीही राहत नाही.
एवढ्या मोठ्या शहरात फक्त चार लोक राहतात. चार लोकांचे हे शहर सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे.
मात्र ही जागा रिकामी करण्यात आली आहे. यामागे येथे केव्हाही घडू शकणारी आण्विक आपत्ती आहे.
या ठिकाणाला न्यूक्लियर डिझास्टर झोन म्हणतात. एकेकाळी या शहरात वस्ती असायची.
दूरवरून लोक इथे येऊन स्थायिक झाले. यानंतर, येथे एक अणु प्रकल्प बांधला गेला, ज्याने इतिहास बदलला.
आज हे शहर ओसाड पडलं आहे. इथे अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला.
त्यामुळे आज ते भूतांचं शहर म्हटलं जातं. सर्व लोक तेथून निघून गेले आहेत.