एकापेक्षा एक विचित्र गोष्टींचा लिलाव झाल्याचं तुम्ही आजवर पाहिलं असेल.
अलीकडेच 'आयर्न मॅन' म्हणजेच हॉलिवूड स्टार रॉबर्ट डाउनी ज्युनियरने चघळलेल्या च्युइंगमचा लिलाव करण्यात आला.
आता खाल्लेल्या पिझ्झाचा लिलाव इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याची किंमत ऐकून तुम्ही शॉक व्हाल.
अमेरिकेत लिल याची नावाचा एक रॅपर आहे, ज्याला हे खाल्लेलं पिझ्झा स्लाइस 4 कोटी रुपयांत विकायचं आहे.
आता तुम्हाला वाटेल की जो पिझ्झा हजार रुपयांमध्ये अप्रतिम टॉपिंग्ससह येईल, त्याच्या खाल्लेल्या तुकड्यासाठी कोणी इतके पैसे का देईल?
मात्र असा दावा आहे की तो हिप-हॉप आयकॉन ऑब्रे ड्रेक ग्राहमने खाल्ला होता, ज्याला त्याचे चाहते ड्रेक म्हणून ओळखतात.
याचीने इंस्टा स्टोरीमध्ये खाल्ल्या पिझ्झा स्लाइसचा फोटो पोस्ट केला आहे.
त्यामध्ये त्याने लिहिलं आहे- ड्रेकने खाल्लेल्या या स्लाइसला 5 लाख डॉलरला विकायचं आहे.
रॅपर याची ड्रेकच्या अगदी जवळचा व्यक्ती आहे आणि बऱ्याच काळापासून त्याच्याशी जोडला गेलेला आहे.
पण सोशल मीडियावर त्याच्या विचित्र लिलावाबद्दल लोकांनी त्याला तसंच ड्रेकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.