भारतातील या ठिकाणी बोलली जाते रहस्यमयी भाषा

जगभरात अनेक रहस्य असून आजतागायत याविषयी अनेकांना माहिती नाहीये. 

असंच एक हिमाचल प्रदेशात वसलेलं गाव आहे ज्याठिकाणी बऱ्याच रहस्यमयी गोष्टी आहेत. 

हिमाचल प्रदेशातील या गावाचे नाव मलाणा आहे. 

हे गाव शुद्ध चरससाठी जगभर ओळखले जाते. 

हिमालयाच्या शिखरावर वसलेल्या या गावात सुमारे 1700 लोक राहतात. 

या गावातील लोक अशी भाषा बोलतात जी त्यांच्याशिवाय कोणाला समजत नाही. 

या गावातील लोक कनाशी भाषा बोलतात. याशिवाय तेथील लोक स्वतःला ग्रीक राजाचे वंशच मानतात. 

असं म्हणतात की, ग्रीक राजा अॅलेक्झांडरने भारतावर हल्ला केला तेव्हा काही सैनिक इथेच राहिले. 

हे लोक बाहेरील लोकांना स्पर्शही करत नाहीत आणि दुसऱ्या गावात लग्नही करत नाहीत.