'देवदूत' उंदीर
वाचवला
माणसांचा जीव
उंदरांना वैतागून त्यांना पळवण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करत नसाल.
माणसांना नकोशा वाटणाऱ्या याच उंदरांनी माणसांना वाचवलं आहे.
एका उंदरामुळे
अख्खं कुटुंब वाचलं आहे.
5 जणांचा जीव वाचला.
राजस्थानच्या
धौलपूर जिल्ह्यातील सिकरौदा गावातील घटना.
एक कुटुंब रात्री शांत झोपलेलं असताना
उंदरामुळे जाग झालं.
जाग आल्यानंतर त्यांना विचित्र आवाज आला,
घर हलू लागलं.
भीतीने कुटुंबातील
पाचही सदस्यांनी
घराबाहेर पळ काढला.
धावत ते घरातून बाहेर आले आणि काही मिनिटातच
घर कोसळलं.
उंदीर आपल्यासाठी
देवदूत बनून आला, असं
या कुटुंबाचं म्हणणं आहे.