24 वर्षे
'ती' एकाच ताटात जेवली आणि...
आपल्या प्रत्येकाचं जेवणाचं एक ठरलेलं ताट असतं.
काही जण तर त्याशिवाय दुसऱ्या ताटात जेवतही नाहीत.
चेन्नईतील एक महिलाही गेली 24 वर्षे एकाच ताटात जेवत होती.
ती या ताटात शक्यतो दुसऱ्या कुणाला जेवू देत नव्हती.
तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या डॉक्टर मुलाला मोठं सत्य समजलं.
आईच्या त्या ताटाबाबतचं सत्य त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं.
आई जेवत होती ते ताट त्याने शाळेत असताना जिंकलेलं बक्षीस होतं.
पण आपण त्याच ताटात जेवतो हे त्याच्या आईने त्याला
शेवटपर्यंत सांगितलं नाही.
डॉक्टर लेकाने सोशल मीडियावर आईबाबत ही इमोशनल पोस्ट केली.