तुम्ही आजपर्यंत अनेक वेगवेगळी झाडं पाहिली असतील किंवा विकतही घेतली असतील.
जगातील सर्वात महागडं झाड कोणतं आहे याविषयी तुम्हाला माहित आहे का? नसेल तर याविषयी जाणून घेऊया.
जगातील सर्वात महागड्या झाडाचं नाव पाइन बोन्साय आहे.
या महागड्या झाडाची किंमत एखाद्या मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यूपेक्षा काही कमी नाही.
झाडाच्या किंमतीत तुम्ही एखादी महागडी कार किंवा आलिशान घरही खरेदी करु शकता.
पाईन बोन्सायची झाडं जसजशी मोठी होत जातात तसतसं त्यांचं जगणं कठिण होतं. त्यामुळे त्यांच्या किंमतीही जास्त आहे.
या झाडाची किंमत कोटींमध्ये आहे.
काही वर्षांपूर्वी जपानमधील ताकामात्सू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बोन्साय परिषदेत बोन्साय ट्री 9 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेण्यात आली होती.
ते आतापर्यंत विकले गेलेले सर्वात महागडे झाड होते.