आपण आजारी पडलो की उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातो 

यावेळी डॉक्टर आपल्याला तपासणी करून कागदावर औषधांची नावं लिहून देतात आणि मेडिकमध्ये जाऊन आपण ती औषधं घेतो

मात्र डॉक्टरांनी दिलेल्या या प्रिस्किप्शनवर Rx असंही लिहिलेलं दिसतं 

डॉक्टर प्रिस्किप्शनवर Rx का लिहितात, हे बऱ्याचजणांना माहित नाही

विशेष बाब म्हणजे या Rx चा नेमका अर्थ काय? हे काही डॉक्टरांनाही माहिती नसतं

Rx हे लॅटीन भाषेमधील एक चिन्ह असून इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ Take होतो.

जर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर Rx लिहिलं असेल तर त्याचा अर्थ असा आहे, की ते तुम्हाला औषधे घेण्यास सांगत आहेत.

इजिप्तचे चिकित्सा क्षेत्रात मोठे योगदान आहे आणि होरस ही इजिप्त देशाची एक देवता आहे

होरस या देवताचे डोळे Rx सारखे दिसतात. हे डोळे स्वास्थ जीवनाचे प्रतिक मानले जातात 

या कारणामुळे डॉक्टर आपल्या प्रिस्किप्शनवर Rx लिहितात, असं म्हटलं जातं.