पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये रोजच अशा काही घटना घडतात, ज्याबद्दल जाणून जगभरातील लोक थक्क होतात.

कोंबडी आणि पोपट यातील फरक तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर कोणीही तुम्हाला ऑनलाइन फसवू शकतं. 

एका व्यक्तीने कोंबडीला हिरवा रंग दिला आणि नंतर त्याला पोपट म्हणत ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न केला.

कराची येथील एका अज्ञात व्यक्तीने लोकप्रिय ऑनलाइन मार्केटप्लेस OLX वर हिरव्या रंगाची कोंबडी पोपट म्हणून 6,500 पाकिस्तानी रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला.

दुकानदाराने वेबसाइटवर एक जाहिरात टाकली होती की त्याला एक विचित्र पोपट सापडला आहे, तो त्याला मोठ्या किमतीला विकायचा आहे. 

पोपटाचा फोटो शेअर करताना दुकानदाराने लोकांना असेही सांगितले की, हा पोपट सूर्योदयाच्या वेळी पहाटे बांग देतो. 

तो सामान्य पोपटांसारखा बोलत नाही असेही लिहिले होते. 

त्या व्यक्तीने कोंबडीला हिरवा रंग दिला आणि ती पोपटासारखी बनवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून कोणाकडून तरी पैसे लुटता येतील. 

जाहिरातीत लिहिलं होतं, “पोपट विक्रीसाठी आहे. हिरवा रंग. बोलत नाही, सकाळी कोंबड्यासारखा आवाज काढतो, का कळत नाही. फक्त इच्छुक लोक मला DM करा."

या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या व्यक्तीच्या अयशस्वी प्रयत्नावर काही लोक हसले आणि अशा लोकांपासून कायमचं दूर राहण्यास सांगितलं.