इंडोनेशियात बाली शिवाय असं एक ठिकाण आहे, जे खूपच सुंदर आहे. म्हणून त्याला पृथ्वीवरील शेवटचं स्वर्ग असं म्हणतात.
या बेटाचे नाव राजा अम्पट आहे. हा बेट त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो.
दुसर्या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या मॅक्स एमर नावाच्या माणसाने बेटाचा शोध लावला
येथे सागरी जैवविविधता आणि दुर्गम स्थानामुळे, लोक राजा अम्पट या बेटाला पृथ्वीवरील शेवटचे स्वर्ग म्हणून संबोधतात.
तसेच हे बेट खूपच लांब असल्यामुळे आणि ते खूपच सुंदर असल्यामुळेच त्याला पृथ्वीवरील शेवटचे स्वर्ग असं नाव देण्यात आलं
या राजा अम्पट बेटावर माशांच्या 1600 प्रजाती आढळतात. जगात आढळणाऱ्या प्रवाळ प्रजातींपैकी ७५ टक्के प्रजातीही येथे आढळतात.
काही लोक या बेटाची तुलना मालदीवच्या बेटशी पण करतात, परंतू हे कदाचित त्याहूनही अधिक सुंदर आसावं असं अनेकांचं म्हणणं आहे.
राजा अम्पट बेटाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. पर्यटकांना येथे डायव्हिंग आवडते. इथे सगळीकडे हिरवळ आहे.
या बेटावर पाहण्यासारखी अनेक सुंदर ठिकाणं आहेत, जी तुम्हाला कधीच कंटाळवानं वाटू देणार नाहीत.