वाहन सुरू करण्यासाठी चावीची आवश्यकता असते. त्याशिवाय ते सुरू होत नाही.
पण तुम्ही कधी विचार केलाय का, ट्रेन सुरू कशी होते? ट्रेन सुरू करण्यासाठी चावी लागते का?
ट्रेनचं इंजिन सुरू करण्यासाठीसुद्धा विशेष प्रकारची चावी वापरली जाते
साधारणपणे 'इलेक्ट्रिक ट्रेन इंजिन' आणि 'डिझेल ट्रेन इंजिन' असे ट्रेनच्या इंजिनचे दोन प्रकार आहेत
डिझेल इंजिन ट्रेनसाधारणपणे दोन प्रकारची इंजिनं असतात. हे पारंपरिक आणि एचएचपी लोको असतं
हे चावीशिवाय सुरू होते, पण ट्रेन रिव्हर्स घेण्यासाठी विशिष्ट प्रकारची चावी लागतेच, ज्याला लोकोपायलट रिव्हर्सर हँडल म्हणतात
इक्ट्रिक इंजिन ट्रेन सुरू करण्यासाठी प्रथम पँटोग्राफ पूर्णपणे हवेच्या दाबाने भरतात.
नंतर कॉन्टॅक्ट वायर वर उचलून सर्किट ब्रेकर ऑन करतात. ही संपूर्ण गोष्ट चावीद्वारे केली जाते, ज्याला 'झेड पीटी' किंवा 'पॅंटो की' म्हणतात.
नवीन इलेक्ट्रिक इंजिन सुरू करण्यासाठी चावीची आवश्यकता नाही. यामध्ये, होमेन सर्किट ब्रेकरला स्विचद्वारे ऑन करून लॉक केलं जातं.