प्लास्टिकच्या टेबलाच्या मध्यभागी एक छिद्र असल्याचं पाहिलं असेल
यामध्ये आपण आपलं बोट टाकून तो उचलतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, तो होल किंवा लहान छिद्र का असतो?
याचं उत्तर दडलंय विज्ञानात
प्लास्टिक उत्पादने बनवणारा कारखाना ब्रँडेड असो किंवा स्थानिक असो, सर्वत्र उत्पादनासाठी सायन्सचे सामान्य नियम पाळले जातात
या टेबल किंवा स्टूलच्या मधोमध एक मोठा खड्डा मुद्दाम केला जातो, कारण आहे जागेची कमतरता
तुमचे घर असो किंवा दुकान, प्लॅस्टिकचे स्टूल अनेकदा एकमेकांच्या वर ठेवलेले असतात
जर या टेबलाला छिद्र नसेल तर ते एकमेकांमध्ये घट्ट अडकून बसतील आणि हवेच्या प्रेशरमुळे ते बाहेर देखील निघणार नाही
म्हणूनच विज्ञानाच्या नियमानुसार स्टूलमध्ये छिद्र असते
जर जास्त वजनाची व्यक्ती स्टूलवर उभी असेल आणि तरीही तो सहज तुटत नसेल तर यामागे स्टूलला केलेलं छिद्र महत्त्वाची भूमिका बजावते
आणखी एक कारण म्हणजे स्टूलमध्ये एक छिद्र सोडल्यास, प्लास्टीक वाचतं, ज्यामुळे याला बनवण्याचा खर्च कमी होतो