भारतात सर्व नद्यांना देवीचं स्थान दिलं जातं. म्हणून त्यांची पूजा केली जाते.
पौरानिक काळापासून नद्यांना विशेष स्थान दिलं जातं आणि अजूनही त्यांची खास मान्यता आहे.
नद्यांसाठी नेहमी स्त्रीलिंगी वापर केला जातो. मात्र भारतात अशीही एक नदी आहे ज्याला पुल्लिंगी म्हटलंय.
भारतातील या पुरुष नदीचं नाव आहे, ब्रम्हपुत्रा
वेदांमध्ये या नदीचं वर्णन पुल्लिंगी केले आहे.
ब्रम्हपुत्रा नदीचा अर्थ आहे की ब्रम्हदेवाचा पुत्र म्हणून याला पुल्लींगी म्हटलं जातं.
हिंदू धर्मानुसार, ब्रम्हपुत्रा नदीचा उगम ब्रम्हाजींपासून झाला आणि पालन अमोघ ऋषींनी केलं.
तिबेटमध्ये सुरु होणारी ही नदी भारतातून बांगलादेशपर्यंत वाहत जाते.
ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. नदीची लांबी सुमारे 2700 किमी आहे.