दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र तरीही अनेकांना यासंबंधीत महत्त्वाच्या गोष्टींची माहिती नाही
त्यापैकी एक म्हणजे TTE आणि TC या दोघांमध्ये फरक काय?
अनेकांना हे दोघेही सारखेच वाटतात. पण असं नाही.
दोघांचा संबंधी तिकीटाशी आहे, पण त्यांचे अधिकार आणि कार्य वेगळे आहेत.
TTE चा फूलफॉर्म ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक असतो. त्यांचे मुख्य काम ट्रेनमध्ये प्रवाशांचे तिकिटे तपासणे
TTEचे काम तिकिटाशिवाय प्रवास करणार्या लोकांकडून दंड वसूल करणे देखील आहे
तसेच TTE ट्रेनमधील रिकाम्या सीटबद्दल देखील निर्णय घेऊ शकतात.
TC चा फूलफॉर्म तिकीट कलेक्टर आहे.
TC चे काम TTE सारखेच आहे, फरक असा की TC ट्रेन च्या आत तिकीट चेक करत नाही.
TCची ड्यूटी प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासण्याची असते.
हे दोघेही रेल्वेच्या वाणिज्य विभागाने नियुक्त केले असतात आणि दोघेही या विभागाचेच कर्मचारी आहेत.