पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांवरील विश्वास अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो. मात्र एका महिलेला फक्त पतीनेच नाही तर बहिणीनेही फसवलं
महिलेला वाटलं की तिचा नवरा तिची खूप काळजी घेतो आणि त्याच्यापेक्षा चांगलं कोणीही असू शकत नाही.
मात्र जेव्हा तिला पतीच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता.
पतीने तिची फसवणूक करत तिच्याच बहिणीशी संबंध ठेवले.
पत्नीची बहीण गरोदर होईपर्यंत त्याने ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली.
ही गोष्ट पत्नीला आणखीनच त्रास देणारी होती, की दोघीही एकाच वेळी गरोदर राहिल्या
पतीने तिची माफी मागितली आणि तिला सांगितलं की, त्याचे फक्त मेहुणीसोबत संबंधच नाहीत तर आता ती त्याच्या जुळ्या मुलांची आईदेखील होणार आहे.
हे ऐकून महिलेला धक्का बसला, कारण तीदेखील लवकरच बाळाला जन्म देणार होती.
महिलेचं म्हणणं आहे की, नवरा कदाचित तिला घटस्फोट देऊन तिच्या बहिणीसोबत नवीन आयुष्य सुरू करणार होता
पण पत्नी गरोदर असल्याचं समजल्यावर त्याने तसं केलं नाही.
आर्थिक सुरक्षेसाठी महिलाही त्याला सोडू इच्छित नाही. मात्र लोकांनी या महिलेला पतीला घटस्फोट देण्याचा सल्ला दिला आहे.