'या' ट्रीकने शोधा रुममधील Hidden कॅमेरा

तुम्ही हॉटेलमध्ये थांबत असाल तर, काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं

छुपा कॅमेरा नाही ना हे पाहण्यासाठी पॉवर सॉकेट, हेयर ड्रायर, फायर अलार्म असलेल्या ठिकाणांची तपासणी करावी 

अनेकदा बाथरूममधील शॉवरमध्ये कॅमेरा लपवलेला असतो. ते देखील चेक करा

रुममधले सर्व दिवे बंद करून पाहावेत. असं केल्याने कॅमेराची मंद लाइट लगेच लक्षात येते

आरश्याच्या आसपास छुपा कॅमेरा लावतात. त्यामुळे तुम्ही रुममधली कपाटं, बाथरूम आणि रुममधील आरसे तपासून पाहावे

यासाठी तुमचं एक बोट आरशावर ठेवा, जर तुमच्या बोटाच्या प्रतिबिंबात अंतर दिसलं तर आरसा सामान्य आहे असं समजावं

पण जर आरशात असं अंतर दिसलं नाही तर तो टू-वे मिरर आहे असं समजावं, म्हणजेच हे धोक्याचं आहे

टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सही चेक करा, याची लाईट्स चालूच असतात, याचा फायदा घेत त्यात कॅमेरा लावला जातो

तुम्ही स्मार्टफोनचा फ्लॅशलाइट लावून या दोन्ही वस्तूंची तपासणी करू शकता

तुम्हाला त्यात ब्लू किंवा पर्पल लाइट दिसला, तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं आणि लगेच पोलिसांना फोन लावा