किड्यांपासून Silk कसं बनतं कधी पाहिलंय?
रेशीम हे किड्यांपासून मिळतं, हे आपण ऐकलं आहे. पण ते कसं तयार केलं जातं याची प्रोसेस अनेकांना माहिती नाही
रेशम किडे हे आपल्याभोवती रेशम तयार करतात आणि तेच रेशीम काढून आपण त्याचं कापड बनवतो.
सध्या सोशल मीडियावर यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत किडे रेशीम कसं तयार करतात ते यापासून धागे कसं तयार केलं जातं हे सगळं दाखवलं आहे
सिल्क बनवणं हे खूप मेहनतीचं काम आहे. म्हणून त्याची साडी किंवा कपडे आपल्याला महागात मिळतात.
प्रथम, कारागीर रेशमाचे किडे गोलाकार लाकडी चौकटीत ठेवतात.
काही दिवसांनी, रेशीम किडे नैसर्गिक पद्धतीने तंतू काढून स्वतःवर 'प्यूपा' किंवा 'कोकून' बनवतात.
हा प्यूपा गरम पाण्यात टाकून धुतला जातो आणि अतिशय काळजीपूर्वक तंतू एक एक करून मशीनवर टाकले जातात.
शेवटी, सर्व तंतू एकत्र येऊन एक धागा तयार होतो. रेशीमाला आपण सिल्क असेही म्हणतो.
या सगळ्या प्रक्रियेत रेशमी किड्यांना मात्र आपले प्राण गमवावे लागतात.