लग्नाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे.
लग्नाची वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचलेल्या नवरदेवाचं प्रेमप्रकरण उघड झालं.
यानंतर विवाह सोहळ्यात गोंधळ उडाला अन् नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावण्यात आलं.
आश्चर्याची बाब म्हणजे ही प्रेयसी तरुणाची मेहुणीच निघाली
लग्नाच्यावेळी नवरी आणि नवरदेवाने एकमेकांना पुष्पहार घातला.
पण, कथेत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा वधूच्या धाकट्या बहिणीने होणाऱ्या दाजीला धमकी दिली
राजेशने तिच्या बहिणीशी लग्न केलं तर ती छतावरून उडी मारून स्वतःला संपवेल, असं तिने म्हटलं
यानंतर घाबरलेल्या राजेशने कुटुंबीयांना हकीकत सांगितली.
पुतुलची बहीण रिंकू हिच्याशी राजेशचं लग्न ठरलं होतं. इकडे छपरा येथील एका कॉलेजमध्ये पुतुलची इंटरमिजिएट परीक्षा सुरू होती.
दरम्यान, पुतुल तिचा भावी दाजी राजेशला सतत भेटू लागली आणि दोघं प्रेमात पडले होते
अखेर घरच्यांनी हे सगळं ऐकून मेहुणीसोबत नवरदेवाचं लग्न लावलं