आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपण फारसा विचार करत नाही.
तुम्ही अनेकदा रस्त्यावरील झाडांना रंग मारलेला पाहिलं असेल. पण हे का मारलं जातं कारण माहितीय?
झाडाला पांढरा रंग मारण्याचे अनेक कारणं काय आहे, ते काय आहेत, चला जाणून घेऊया...
1. रहदारीसाठी
लोकांना सतर्क करणं हा महत्वाचा उद्देश आहे.
पांढरा रंग रात्री रिफ्लेक्ट करतो, ज्यामुळे लोकांना रस्ता दिसण्यासाठी सोप्पं होतं.
2. झाडांचं संरक्षण
झाडांना चुन्याने रंग दिला जातो, त्यामुळे झाडांना कीटकांचा कमी धोका असतो.
सेच चुन्यामुळे झाडाची मुळे कमकुवत होत नाहीत. किडे यावर चढत नाही.
3. सूर्यप्रकाशापासून संरक्षण
झाडाचं लाकूड सुकतं आणि त्याला तडा जातात. त्यामुळे त्यांची साल देठापासून वेगळी होऊ लागते.
झाडांना पांढरे रंग दिल्याने सूर्यकिरणांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे झाड निरोगी राहते.