सापालाही पाय होते, काय आहे इतिहास?
सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी साप हा खूप धोकादायक आहे.
सापाला पाय होते असं मानलं जातं. यामागे काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.
सापांच्या उत्क्रांतीचा कमीत कमी अभ्यास केला गेलाय.
याचं कारण सापांच्या पूर्वजांचे शरीर नाजूक होते आणि त्यांचे जतन केलेले अवशेष, जीवाश्म कमी आहेत.
असं मानलं जातं की, वारनिड्स कुटुंबातील सरड्यांपासून सापांची उत्क्रांती झाली.
कालांतराने वारनिड्सचे वंशज त्यांचे पाय गमावू लागले.
ज्यामुळे साप आणि सरडे यांच्यातील अनेक प्रकारांचा जन्म झाला.
पॅलेओन्टोलॉजिस्टना युपोडोफिस, हॅसिओफिस, पचिराचिस आणि नजाश या चार सापांच्या नामशेष प्रजातींचा शोध लागलाय.
सरपटणारे प्राणी अवयव गमावण्यापूर्वीच पर्यावरणीय, भौगोलिक ठिकाणी विविधता आणत होते.