तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी भूकंपाने हाहाकार माजवला. अजूनही तेथे बचाव कार्य सुरु आहे.
मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. तर बरेच लोक जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेदरम्यानचा पहाटेच्या वेळी पक्ष्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला, ज्यामध्ये भुकंपाच्या आधी पक्षी इकडे तिकडे पळताना दिसत आहे.
या पक्षांचा आवाज आणि गोंधळ ऐकूनच हे स्पष्ट होत आहे की त्यांना काहीतरी भयानक घडणार आहे, याची चाहूल लागली असावी.
तुम्ही लोकांना बऱ्याचदा असे बोलताना ऐकलं असेल की प्राणी आणि पक्ष्यांना भूकंपाची आधीच माहिती मिळते.
पण हे किती सत्य आहे? खरंच असं होतं काय, चला या रहस्याबद्दल जाणून घेऊ.
ज्योतिषांच्या मते, भूकंप होण्यापूर्वी पाण्यातील मासे आणि बेडूक यांना माहिती मिळते. त्यानंतर ते पाण्याच्या मध्यभागी सोडून किनाऱ्याकडे धावू लागतात.
मांजरी अचानक रडायला लागतात आणि कुत्रे भुंकायला लागतात. साप आपल्या बिळातून बाहेर येतो आणि इकडे तिकडे धावू लागतो.
पण विज्ञानाच्या मते भूकंप होण्यापूर्वीच पक्षी आणि प्राण्यांनाच ते जाणवतं, कारण त्यांना कमी वारंवारतेच्या ध्वनी लहरी ऐकू येतात.
त्या तुलनेत मानवी कान हे कमी वारंवारतेच्या ध्वनी लहरी ऐकू शकत नाहीत.
प्राणी आणि पक्ष्यांसाठी या ध्वनी लहरी भयावह आवाजासारख्या असतात. त्यामुळेच या आवाजाला घाबरून ते इकडे तिकडे धावू लागतात.
असं म्हणतात प्राण्यांना केवळ भूकंप जाणवत नाहीत तर त्यांना ज्वालामुखीचा उद्रेक किंवा त्सुनामी आल्याची ही जाणीव होते.
वास्तविक त्यांना पृथ्वीच्या आत होत असलेल्या सूक्ष्म लहरी आणि हालचाली आधीच जाणवतात. त्यामुळे ते मानवाला त्यांच्या विचित्र वागण्यातून सावध करतात.