बहुतांश वेळा असं होतं की समोरच्याने जांभई दिल्यावर आपल्यालाही जांभई येते.
मात्र समोरच्याने जांभई दिल्यावर आपल्याला पण का येते असा कधी विचार केला का?
नुकतेच इटालियन शास्त्रज्ञाने जांभई येण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
शास्त्रज्ञाने सांगितलं की, एखाद्याला पाहून जांभई येण्याला मिरर न्यूरॉन जबाबदार आहे.
हा न्यूरॉन 1996 मध्ये जियाकोमा रिझोलाटी नावाच्या न्यूरोबायोलॉजिस्टने शोधला होता.
हे न्यूरॉन नवीन शिकणे, अनुकरण करणे आणि सहानुभूती दाखवण्याचं काम करते.
मिरर न्यूरॉन मेंदुच्या चार भागांमध्ये आढळतो.
प्री मोटर, इनफिरियर फ्रंटल गायरस, पॅरिएटल लोब आणि सुपीरियर टेम्पोरल सल्कस. या न्यूरॉनचा परिणाम त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर होतो.
जांभई येण्याविषयी बऱ्याच दिवसांपासून संशोधन सुरु आहे. याविषयी अनेकांनी बरेच निष्कर्ष काढले आहेत.