Heading 3
उंट हा उंच आणि वाळवंटी ठिकाणी राहणारा प्राणी आहे.
आपण उंटाला पाहिलं तर पहिलं लक्ष त्याच्या पाठीवरील उंच कुबड्यांकडे जातं.
असं म्हटलं जातं की उंट पाठीवरील कुबड्यांमध्ये पाणी साठवून ठेवतो. आता हे किती खरं आहे याविषयी जाणून घेऊया.
उंटांच्या वरच्या कुबड्या पाणी साठवण्यासाठी असतात, असं म्हटलं जातं. मात्र हे चुकीचं आहे.
खरं तर उंटाच्या कुबड्यांमध्ये चरबी असते.
ते कुबड्यांमध्ये पाणी साचवत नाहीत. रोजच्या पाण्याशिवायही उंट ऊर्जावान असतात.
उंट पूर्ण कुबड्याच्या मदतीने 4 ते 6 महिने घालवू शकतो.
स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी उंट शरीराच्या कुबड्यात साठलेल्या चरबीची मदत घेतात.
एक उंट त्याच्या पाठीवरील कुबड्यामध्ये 37 किलो चरबी साठवू शकतो.