प्रवाशाचं विमानाच्या सीटवर किळसवाणं कृत्य

नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये व्यक्तीने सीटवरच लघवी केली. 

39 वर्षीय जॉन्सन आपल्या पत्नीसह दुबईला सुट्टीसाठी गेला होता.

 दुबईहून मँचेस्टरला परतत असताना ही घटना घडली. जॉन्सनने फ्लाइटमध्ये खूप मद्यपान केले.

 विमान उतरल्यानंतर जॉन्सनला टॉयलेट वापराचं होतं. मात्र एअरहोस्टेसने त्याला तसे करण्यापासून रोखले.

लँडिंगनंतर विमानात टॉयलेटचा वापर करण्यास मनाई आहे. 

रागाच्या भरात त्याने सीटवर लघवी केली.

विमानातून उतरल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

घटनेच्या वेळी व्यक्ती खूप मद्यधुंद होती आणि पायावर उभी राहण्याच्या स्थितीतही नव्हती. 

कोर्टाने जॉन्सनला दंड ठोठावला. त्याने कोणाचेही नुकसान केले नाही हे सिद्ध झाल्याने त्याला तुरुंगात टाकलं नाही.