टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून विक्रेत्याचा
Desi Jugad

सुरुवातीच्या काळात पावसाच्या दांडीमुळे आता सगळ्याच भाज्या महागल्या आहेत.

यासगळ्यात टोमॅटोने तर सगळीच हद्दीपार करत. आता 130 ते 150 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत.

यामुळे गृहिणींचं बजेट आता कोलमडलं आहे. गृहिणी टोमॅटोला पर्याय म्हणून इतर गोष्टींकडे पाहात आहेत.

गृहिणीच काय भाजीवाले देखील एकही टोमॅटो चोरीला जाऊ नये किंवा वाया जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

याचाच एक भाग म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यानं एक भन्नाट कल्पना राबवलीय.

मुट्टपा नावाच्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतातले टोमॅटो बाजारात विकायला आणलेत. त्याचबरोबर एक सीसीटीव्ही कॅमेराही आणलाय.

फुटपाथवरच्या भाजीच्या स्टॉलवर त्यानं सीसीटीव्ही कॅमेरा बसवलाय. ज्यामुळे त्याची काही फसव्या ग्राहकांकडून लूट होणार नाही.

टोमॅटोच्या ढिगामागेच त्याने हा कॅमेरा बसवलाय. त्याला बॅटरी जोडलेली आहे.

सध्या मला स्वतःचं थोडंही नुकसान करून घ्यायचं नाही. त्यामुळे हा कॅमेरा लावला असल्याचं मुट्टप्पांनी सांगितलं.