मेल्यानंतर माणूस स्वर्गात किंवा नरकात जातो असं म्हणतात. हे किती खरं-खोटं हा वादाचा विषय आहे.
तुम्ही कधी विचार केलाय का की मेलेल्या माणसाचं काय होत असेल किंवा मेल्यानंतर माणसाला काय वाटत असेल?
चला जाणून घेऊ की, वर्चुअर रिएलिटीमध्ये मरण माणसासाठी काय असेल?
शॉन ग्लॅडवेल या कलाकाराने पासिंग इलेक्ट्रिकल स्टॉर्म्स असे प्रदर्शन तयार केलं, जे लोकांना मरताना काय वाटतं हे जवळून दाखवते.
यासाठी व्यक्तीला तात्पुरत्या हॉस्पिटलच्या बेडवर झोपावे लागेल. तेव्हा त्याच्यावर हा प्रयोग केला जातो.
मेलबर्नचे प्रदर्शक मार्कस क्रुक यांनी वर्चुअल रिएलिटीमध्ये मरणे काय असते याचे वर्णन केले आहे
ते म्हणाले, "वर्चुअल रिएलिटीहा मृत्यूचा जवळचा अनुभव येतो, जो स्वतः प्रयत्न करणार्यांशिवाय कोणालाही समजू शकत नाही."
या प्रयोगाचा अनुभव ऑस्ट्रेलियामध्ये इच्छूक लोकांना दिला जातो.
अनुभव घेतलेल्या लोकांच्या म्हणण्या प्रमाणे शरीराला सोडून आत्मा हवेत तरंगतोय असा भास होतो.