एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, ज्यामध्ये माकड मांजरीसोबत दिसत आहे
या व्हिडीओत माकड मांजरीची मदत करण्याचा प्रयत्न करतोय.
मांजर एका खड्यात पडली आहे, जिथे खूप चिखल आहे. ज्यामुळे मांजरीला आता पुन्हा वर चढता येत नाही.
माकडाला मांजर अडकल्याचे लक्षात येते, तेव्हा तो मदतीसाठी खाली जातो आणि तिला उचलतो.
अनेक प्रयत्न करुन सुद्धा माकडाला मांजरीला वरती आणता आले नाही. अखेर तो त्याच्या साथीदाराला बोलावतो
माकडाचा साथीदार मांजरीसाठी मदत करायला तयार नसतो, त्याचा साथीदार लांब पळतो. ज्यामुळे माकड हताश होतो.
अखेर हे सगळं कॅमेरात टिपणारी महिला त्या खड्यातून मांजरीला बाहेर काढते.
हे पाहून माकडाला आनंद होतो. माकड या मांजरीला मीठी मारुन बसल्याचे दिसते.
हा व्हिडीओ इंटरनेटवरील सर्वात क्यूट व्हिडीओ असल्याचं नेटकऱ्यांंचं म्हणणं आहे.