खतरनाक मगरीनेही दाखवली माणुसकी

मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.

सिंह, वाघ, चित्ता अशा प्राण्यांचाही मगरीसमोर टिकाव लागत नाही.

असं असताना मगरीने माणसाची मदत केली असं सांगितलं तर आश्चर्य वाटणारच.

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी गल्फ टुडेचा व्हिडीओ
ट्विटरवर पोस्ट केला. 

पोस्टमधील माहितीनुसार इंडोनेशियातील ही घटना.

मगरींचं साम्राज्य असलेल्या नदीत मुलगा बुडाला होता जो सापडला नव्हता.

पण मगरीने त्याला आपल्या पाठीवरून नदीतून बाहेर आणलं.

व्हिडीओत पाहू शकता
नदीत दिसणाऱ्या मगरीच्या
पाठीवर मुलगा आहे.

मगर मुलाला पाठीवरून आणत एका होडीपर्यंत सोडते आणि मागे फिरते.

मगरीचं असं रूप पाहून यावर कुणाचा विश्वासच बसत नाही आहे.