तो, ती आणि साप; अनोखी लव्ह स्टोरी
आजकाल लग्नाआधी प्री-वेडिंग शूटचं क्रेझ वाढलं आहे.
लोक वेगवेगळ्या थीम वापरत फोटोशूट करतात.
नुकतंच एक हटके फोटोशूट समोर आलं आहे ज्यामध्ये कपलने सापासोबत शूट केलं आहे.
कपलने धोकादायक कोब्रासोबत फोटोशूट केलं असून ते सध्या व्हायरल होतंय.
तरुणी एका ठिकाणाहून जात असले तिथं तिला एक साप दिसतो आणि ती त्याला बघून घाबरते.
त्यानंतर ती फोन करून सर्पमित्रांना बोलावते. काही वेळातच सर्पमित्र तिथं येतो आणि सापाला पकडतो.
जाता जाता सर्पमित्र तरुणीला फोन करण्याचं इशारा करतो.
त्यानंतर तरुणी आणि सर्पमित्र एकमेकांच्या प्रेमात पडतात.
विवेक नावाच्या ट्विटर युझरने प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.