50 हजार रुपयांचा कोंबडा
काय आहे
याच्यात खास?
कोंबड्याची किंमत फार फार तर किती असेल? काही शे रुपये.
पण असा एक कोंबडा जो तब्बल 50 हजार रुपयांचा आहे.
या कोंबड्याला
खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली.
केरळच्या
थाचमपारा कुन्नथुकावु मंदिर समितीमार्फत कोंबड्याचा लिलाव झाला.
जास्तीत जास्त 5 हजार रुपये मिळण्याची अपेक्षा मंदिर समितीला होती.
फक्त 10 रुपयांपासून लिलाव सुरू झाला तो
50 हजारांवर पोहोचला.
अखेरची बोली 50 हजार रुपये लावून कूल बॉयजने हा कोंबडा खरेदी केला.
हा कोंबडा मंदिर समितीच्या अध्यक्षांनी
दान केला होता.
तसं या कोंबड्यात खास काही नाही, तो इतर कोंबड्यांप्रमाणे सामान्यच आहे.
फक्त बोलीच्या चढाओढीत हा कोंबडा इतक्या किमतीला विकला गेला.